नाशकात नववीतील विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची मैदानावर हत्या

ओझरमधल्या एका नावाजलेल्या शाळेत हा प्रकार घडला. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 31, 2017, 11:46 PM IST
नाशकात नववीतील विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची मैदानावर हत्या title=

नाशिक : नाशकात नववीतील विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची मैदानावर हत्या केली आहे. ओझरमधल्या एका नावाजलेल्या शाळेत हा प्रकार घडला. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मयत विद्यार्थी सतत टपल्या मारत असल्याचा राग आरोपी विद्यार्थ्याच्या मनात राग होता. त्यामुळे आरोपीने दप्तरातून चाकू शाळेत आणला होता. इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने छातीत चाकूने वर्गमित्राची हत्या केली. 

आरोपीला संबंधित विद्यार्थ्याने टपली मारली आणि मंगळवारी पीटीचा तास सुरु असताना पुन्हा त्याच रागातून आरोपीने चाकू बाहेर काढला आणि शाळेतच मित्राच्या छातीत सुरा खुपसला. संध्याकाळी मैदानावर ही घटना घडली.

जखमी विद्यार्थ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तो पर्यंत या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.