एसटीने पेट घेतला...अन् प्रवासी

जिल्ह्यातील तळेगाव इंथल्या चक्री घाटात बडनेरा-नागपूर या एसटी बसच्या इंजिनला आग लागलीय. आग भीषण असल्यानं बसचं इंजन क्षणात जळून खाक झालं.

Updated: Mar 2, 2016, 07:56 AM IST
एसटीने पेट घेतला...अन् प्रवासी title=

वर्धा : जिल्ह्यातील तळेगाव इंथल्या चक्री घाटात बडनेरा-नागपूर या एसटी बसच्या इंजिनला आग लागलीय. आग भीषण असल्यानं बसचं इंजन क्षणात जळून खाक झालं.

एसटीच्या इंजनला आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं. इंजिनला वायरच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.