ठाणे : कासारवडवली येथील थरकाप उडवणाऱ्या हत्याकांड प्रकरणी आता नवी माहिती उजेडात येतेय. हत्याकांडात एक मोठा खुलासा समोर येतोय. स्वतःच्याच कुटुंबातल्या १४ जणांची गळे कापून हत्या करणाऱ्या हसनेन अन्वर वरेकर याच्या बहिणीने आपल्या जबानीत धक्कादायक माहिती दिलीय. हसनेन वरेकर हा धार्मिक प्रवृत्तीचा होता.
मशिदीत पाच पाच तास तो बसून असायचा. हातात गंडेदोरे बांधायचा. कुर्बानी द्यायचा. त्यामुळं कुणा भोंदूबाबाच्या नादी तर लागला नव्हता ना, यादृष्टीनं आता पोलीस तपास करतायत. एवढंच नव्हे तर त्याचं व्यक्तिमत्त्व डबल पर्सनॅलिटी स्वरूपाचं होतं का, याबाबत तपास करण्यासाठी पोलीस आता मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतायत.
मैने सब घरवालों को खतम किया हें, मै तुम्हे भी नाही छोडुंगा अशी धमकी देत आपला भाऊ हसने आपल्यावर हल्ला करण्यासाठी धाऊन आला आणि त्यानं आपल्या मानेवर वार केल्याचा जबाब कासारवडवली हत्याकांडातील जखमी सुबिया भरमार ने ठाणे पोलिसांना दिला आहे.
कासारवडवली हत्याकांडातील आरोपी हसनेन वरेकर याच्या लॅपटॉपमध्ये धार्मिक प्रवचने सापडली असून मोबाईल मध्ये सुद्धा धार्मिक गोष्टींवरचे चॅट पोलिसांना आढळलेत. पोलीसांकडू अधिक तपास सुरु आहे.