देहविक्रीच्या आरोपाखाली दाक्षिणात्य मॉडेलला अटक

एका मॉडेलला देहविक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमात या मॉडेलने कामं केली आहेत. 

Updated: Aug 6, 2014, 08:53 PM IST
देहविक्रीच्या आरोपाखाली दाक्षिणात्य मॉडेलला अटक title=

नागपूर : एका मॉडेलला देहविक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमात या मॉडेलने कामं केली आहेत. 

नागपूरच्या सीताबर्डी भागातल्या शुक्ला लॉजमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. अमजद अली नावाच्या दलालाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता. 

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या मॉडेलसह अन्य दोन मुलींना अटक करण्यात आलीय. अन्य एकाला ताब्यात घेण्यात आलंय. मॉडेल व्यतिरिक्त अटक झालेल्या मुली महाविद्यालयीन तरूणी आहेत. 

पोलिसांना घटनास्थळावरून एक डायरी मिळाली असून त्यात अनेक धनदांड्ग्यांची आणि प्रतिष्ठितांची नावे असल्याची शक्यता असल्याने पोलिस त्या दृष्टीने चौकशी करीत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.