पोलिसांना 'आपल्या खास' रिंगटोन्स वाजवता येणार नाहीत?

पोलिसांनी सिनेमा, मालिका किंवा राजकीय पक्षांची गाणी अशा प्रकारच्या कॉलर ट्यून्स किंवा रिंगटोन ठेवू नका, असं नाही केलं तर पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. जनता पोलिसांवर हसते, असं म्हणून या रिंगटोन टाळा असं आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.

Updated: Dec 23, 2015, 07:03 PM IST
पोलिसांना 'आपल्या खास' रिंगटोन्स वाजवता येणार नाहीत? title=

औरंगाबाद : पोलिसांनी सिनेमा, मालिका किंवा राजकीय पक्षांची गाणी अशा प्रकारच्या कॉलर ट्यून्स किंवा रिंगटोन ठेवू नका, असं नाही केलं तर पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. जनता पोलिसांवर हसते, असं म्हणून या रिंगटोन टाळा असं आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.

कॉलर ट्यून आणि रिंगटोन कुणी काय ठेवलं असेल, याचा काही नेम नाही. पण याची गंभीर दखल घेतं विश्वास नांगरे पाटील यांनी एक परिपत्रकच काढलं आहे. 

औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड ,परभणी, लातूर, हिंगोली या परिक्षेत्रातील पोलिसांना हे पत्रक लागू करण्यात आलंय. मात्र, या पत्रकाबद्दल पोलिस कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र दुसऱ्याबाजूला या विषयी पोलिस उघडपणे बोलायला, किंवा आपलं मत मांडायला तयार नसल्याचं दिसतंय.

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आपल्या मोबाईलची रिंगटोन आणि कॉलर ट्यून ठेवण्याबाबत परिपत्रक जाहीर केलंय. 

पोलिसांच्या मोबाईलच्या रिंगटोन आणि कॉलर ट्यून, गेल्या काही दिवसांपासून निरनिराळ्या सिनेमांच्या मालिकांच्या अथवा पक्षांच्या गाण्यांच्या ठेवल्याचं निदर्शनास आलंय.
पोलिसांच्या प्रतिमेला त्यामुळे तडा जात असल्याचं निदर्शनास आल्यामुळे, अशा पद्धतीच्या रिंगटोन्स अथवा कॉलर ट्यून्स त्वरीत बदलण्यात याव्यात, असे आदेश या परिपत्रकातून देण्यात आले आहे.

राजशिष्टाचाराच्या अनुषंगाने याबाबत सर्व वरिष्ठांनी आपल्या कनिष्ठांना याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात देऊन कारवाई करावी, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलंय.