सोलापूर : काँग्रेस पक्षात खालपासून वरपर्यंत नेतृत्व बदलण्याची गरज आहे. सर्व कमिटी बरखास्त करुन नव्या दमाची काँग्रेस उभा करण्याचा सल्ला माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिलाय.
देशातील पाच राज्यांतील निवडणुका आणि महाराष्ट्रातील जिल्हा परीषद महापालिकेच्या निवडनुकानंतर प्रथमच ते आज सोलापुरात पत्रकार परीषदेत ते बोलत होते. लोकसभेची भाजपची हवा आजही कायम आहे. उत्तर प्रदेश सह इतर राज्यात भाजपला जनतेनी निवडून दिलंय म्हणजे जनतेला अजून मोदीचं हवेत असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात स्वच्छतेचे धडे देत फिरतात. मात्र त्यांच्या मतदार संघात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. रस्ते खराब असताना देखील जनतेने त्यांना स्विकारले. EVM मशीनबाबत देशात संशयकल्लोळ असल्याने सर्वचे राजकीय पक्षाने एकत्रित यावर विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
राज्यात जिल्हा परीषदेत सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीबाबत बोलताना त्यांनी जातीयवादी पक्षांसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले.