धक्कादायक! बफर झोनमधील वाघाची शिकार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक धक्कदायक प्रकरण उघडकीस आले आहे. चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील भादुर्णा वाघाची शिकार केल्याचं उघडकीस आलंय.

Updated: Apr 7, 2015, 01:34 PM IST
धक्कादायक!  बफर झोनमधील वाघाची शिकार title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक धक्कदायक प्रकरण उघडकीस आले आहे. चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील भादुर्णा वाघाची शिकार केल्याचं उघडकीस आलंय.

सुमारे ६ महिन्यापूर्वी विजेच्या तारांचा सापळा लावून वाघाची शिकार केली होती. शिका-यांनी या वाघाचे दात, मिशा व नखे काढून या वाघाला घटनास्थळीच जाळण्याचा प्रयत्न केला.

सहा महिन्यानंतर हे आरोपी वाघाचे अवयव विकण्यासाठी मुल या गावी आले  होते. त्यावेळी हा प्रकार उघढकीस आला. याप्रकरणी तीन जणांना वनविभागानं ताब्यात घेतलं असून वनविभागाकडून अधिक तपास सुरु आहे.. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.