ही आहे शिवसेनेची सर्वात तरुण नगरसेविका

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेने आपली सत्ता कायम राखलीये. मात्र या निवडणुकीतील काही निकाल लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेली प्रियंका पाटील या नगरसेविका.

Updated: Feb 24, 2017, 04:47 PM IST
ही आहे शिवसेनेची सर्वात तरुण नगरसेविका title=

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेने आपली सत्ता कायम राखलीये. मात्र या निवडणुकीतील काही निकाल लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेली प्रियंका पाटील या नगरसेविका.

या नगरसेविकेचे वय आहे केवळ २१ वर्षे. प्रियंका पाटील ही शिवसेनेतील सर्वात कमी वयाची नगरसेविका ठरलीये. प्रियंका पाटील यांनी ठाण्यातील प्रभाग क्र २४ ब मधून निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत अडीच हजार मतांनी विजय मिळवलाय. 

प्रियंका पाटील यांचे वडील शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत तर काका ठाण्याचे माजी महापौर होते. प्रियंका सध्या जोंधळे कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत.