परभणी : सासू सुनांची भांडणं, हेवे-दावे म्हणजे खरं तर 'घर घर की कहानी' पण आता परभणीकर सासू सुनाच्या राजकारणाचा अनुभव घेणार आहेत.. परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच सासू-सुना निवडुन आल्या आहेत.
जिंतूर तालुक्यातील कौसडी गटातून बेबीनंदा रोहिणकर आणि मानवत तालुक्यातील रामपुरी गटातून स्नेहा रोहिणकर शिवसेनेकडून निवडून आल्या. एकाच घरात गुण्या-गोविंदाने नांदणा-या या सासूसुना जिल्हा परिषदेत वेगळा ठसा उमटवण्यास सज्ज झाल्या आहेत.
सासूबाई असलेल्या बेबीनंदा वाघिकर याआधीही जिल्हापरिषदेच्या सदस्या होत्याच, तर सुनबाई स्नेहा रोहिणकर यांनी सासुबाईंच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत यावेळच्या निवडणुकीत बाजी मारत राजकारणात प्रवेश केलाय.