ठाणे : जोपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर विराजमान होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची नाही, असा निर्णयच शिवसेनेनं घेतल्याचं दिसतंय.
अधिक वाचा - शिवसेनेचे पारडं जड, मनसेचं इंजिन यार्डातच राहणार का?
कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर बसयला हवा, असा अट्टहास 'एकेकाळ'च्या दोन्ही मित्रपक्षांनी म्हणजेच भाजप आणि शिवसेनेनं घेतलाय. त्यासाठी, कोणतं समीकरण उपयोगी पडेल याकडेच दोन्ही पक्षांचं लक्ष लागून आहे.
अधिक वाचा - केडीएमसी : भाजपने दिली शिवसेनेला महापौरपदासाठी ऑफर
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात दोन कार्यक्रम पार पडले. पण, या कार्यक्रमांना सेनेचा कोणताही बडा नेता उपस्थित नव्हता. सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे हेदेखील या कार्यक्रमांपासून दूरच राहिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.