शिवसेनेच्या राडेबाज नगरसेवकाला अटक

कल्याण डोंबिवलीतला शिवसेनेचा राडेबाज नगरसेवक महेश गायकवाड याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Apr 2, 2017, 10:51 PM IST
शिवसेनेच्या राडेबाज नगरसेवकाला अटक  title=

पाथर्डी : कल्याण डोंबिवलीतला शिवसेनेचा राडेबाज नगरसेवक महेश गायकवाड याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथून कोळसेवाडी पोलिसांनी त्याला शनिवारी ताब्यात घेतलं.

आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीवर हल्ल्याच्या आरोपातून महेश गायकवाडला अटक करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात एकाच खळबळ माजली आहे.

८ मार्चला मध्यरात्रीच्या सुमाराला कल्याण पूर्वेतल्या शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर हल्ला केला गेला होता. सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली होती. त्या आधारे पोलिसांनी तपास करुन, महेश गायकवाडच्या मुसक्या आवळल्या.

महेश गायकवाड अत्यंत वादग्रस्त नगरसेवक असून अनेक गंभीर गुन्हयाची नोंद त्याच्या नावावर आहे. विशेष म्हणजे २५ मार्चला कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय आवारात राडा झाला होता. त्यावेळीही महेश गायकवाड विरोधात गुन्हा दाखल झाला होता.