उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवकासह चार जणांना अटक

भूखंड अपहार केल्याच्या आरोपाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव आणि शिवसेना नगरसेविकेचे पती सोनू चानपूर, त्याचा भाऊ पप्पू चानपूर आणि भूमापन विभागाच्या अधिका-याला अटक करण्यात आलीय. 

Updated: May 25, 2017, 10:48 PM IST
उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवकासह चार जणांना अटक title=

उल्हासनगर : भूखंड अपहार केल्याच्या आरोपाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव आणि शिवसेना नगरसेविकेचे पती सोनू चानपूर, त्याचा भाऊ पप्पू चानपूर आणि भूमापन विभागाच्या अधिका-याला अटक करण्यात आलीय. 

९ कोटी रूपयांचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. उल्हासनगरमध्ये १५३ सरकारी भूखंड होते. त्यापैकी अनेक भूखंड खोटे दस्तावेज वापरून आणि लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या संगनमताने हडप केले गेले. 

मात्र उपविभागीय अधिकारी विजया जाधव यांनी धाडस दाखवलं आणि या सर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या सर्वांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.