पुण्यातही शिवसेना-भाजपची युतीसाठी चर्चा

मुंबईपाठोपाठ पुण्यामध्येही महापालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात आज भाजप सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाली. आजच्या बैठकीत युतीच्या दृष्टीकोनातून सकारात्मक चर्चा झाली.

Updated: Jan 16, 2017, 10:35 PM IST
पुण्यातही शिवसेना-भाजपची युतीसाठी चर्चा  title=

पुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यामध्येही महापालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात आज भाजप सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाली. आजच्या बैठकीत युतीच्या दृष्टीकोनातून सकारात्मक चर्चा झाली.

पुढचे दोन तीन दिवस चर्चेच्या विविध फेऱ्या होणार आहेत. या बैठकीत भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले, तर शिवसेनेकडून संपर्क प्रमुख अमोल कोल्हे आणि शहर प्रमुख विनायक निम्हण सहभागी झाले.