शिवनेरी बसला अपघात, दोनजण जखमी

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मध्यरात्रीच्या सुमारास शिवनेरी बसला अपघात झालाय. 

Updated: Aug 28, 2016, 09:27 AM IST
शिवनेरी बसला अपघात, दोनजण जखमी title=

लोणावळा : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मध्यरात्रीच्या सुमारास शिवनेरी बसला अपघात झालाय. 

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा-या शिवनेरीनं उर्से टोलजवळ उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिलीये. मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडलीये. 

या अपघातात शिवनेरीच्या चालकासह एक प्रवासी गंभीर जखमी झालाय.. घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले असून जखमीना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.