राज ठाकरेंचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं - आठवले

मुख्यमंत्रीपदासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं अशी उपहासात्मक  टीका आठवलेंनी राज ठाकरेंवर केली आहे. 

Updated: Oct 2, 2014, 02:10 PM IST
राज ठाकरेंचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं - आठवले title=

ठाणे : मुख्यमंत्रीपदासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं अशी उपहासात्मक  टीका आठवलेंनी राज ठाकरेंवर केली आहे. 

कांदीवलीतील सभेत राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवलेंवर टीका केली होती. या टीकेला आज बदलापुरात रामदास आठवलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र पेटवून टाकतील आणि मला ते विझवावं लागेल असंही ते पुढे म्हणालेत. 

त्याआधी राज ठाकरे यांनी रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतनं प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं असा सल्लाच राखी सावंतनं दिलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.