दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेचा दौरा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत

सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या शिवसेनेनं उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा आखलाय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

Updated: Dec 19, 2015, 03:27 PM IST
दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेचा दौरा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत  title=

जळगाव : सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या शिवसेनेनं उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा आखलाय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्य मंत्री संजय राठोड यासह शिवसेना आमदार आणि पदाधिकारी उद्या नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी, टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करणार आहेत. 

त्याचबरोबर जालायुक्त शिवार, रोजगार हमी योजना चारा टंचाई, पाणी पुरवठा योजना, पिकं परिस्थिती कर्ज पुनर्गठन, आदी शेततळे आदी योजनांचा आढावा घेणार आहेत. 

या मंत्री आणि आमदारांच्या दौ-याचा अहवाल जळगावमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल. त्यामुळे शिवसेनेनं हा दौरा दुष्काळी की , भाजपवर कुरघोडी करण्यसाठी आखलाय अशी राजकीय चर्चा आतापासूनच रंगू लागलीय.