नाशिक येथील कार अपघातात ५ ठार

नाशिक जिल्ह्यातील वणी-कळवण मार्गावर  खांडे मळ्याजवळ आज पहाटे कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण जागीच ठार झालेत.

Updated: Dec 19, 2015, 02:32 PM IST
नाशिक येथील कार अपघातात ५ ठार title=
संग्रहीत

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वणी-कळवण मार्गावर  खांडे मळ्याजवळ आज पहाटे कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण जागीच ठार झालेत.

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्यांच्या कारला धुक्यामुळे अपघात झाला. धुके दाट असल्याने कार एका झाडावर आदळली. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वणीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातीतील तरुण हे वणी गावचे रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. 

अपघातातील मृत्यूंची नावे
साहिल जावरे, साहिल सय्यद, सचिन शेळके, सकलेन सय्यद, सचिन ढोले

जखमी
इमरान शेख, रोशन खान्दम, ज्ञानेश्वर धूम हे जखमी झालेत.