रत्नागिरी : बातमी आहे 'झी २४ तास'च्या दणक्याची. रत्नागिरी फार्मसी कॉलेज अर्थात औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची तत्वत: मान्यता मिळालीय.
'झी २४ तास'ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी दिल्ली इथं फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अधिक-यांशी बैठक घेतली. या बैठकीनंतर महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळाली.
२००९ सालापासून शासकिय तंत्रनिकेतन संस्थेच्या मुलांच्या वसतिगृहात शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय सुरू आहे. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या इमारतीचं कामकाज अद्याप पूर्ण न झाल्यामुळे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता या महाविद्यालयाला मिळाली नव्हती. त्यामुळं तीन बॅचेस पासआऊट विद्यार्थ्यांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियासं सर्टिफिकेट मिळालेलं नव्हतं. त्यामुळं फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं.
अखेर 'झी २४ तास'च्या बातमीच्या पाठपुराव्यानंतर या मुलांना तत्वत: मान्यता मिळाल्याने यावर्षी पास आऊट होणा-या विद्यार्थ्यांचं शौक्षणिक नुकसान होणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी झी २४ तासचे आभार मानलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.