ठाण्यातील ‘संस्कृती’ दहीहंडीची चढाओढ कायमची बंद - सरनाईक

बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या वरच्या थरावर चढविण्यास होत असलेला वाढता विरोध आणि सरावादरम्यान झालेल्या दोन गोविंदांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'नं त्यांच्या दहीहंडीतील स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Aug 11, 2014, 02:06 PM IST
ठाण्यातील ‘संस्कृती’ दहीहंडीची चढाओढ कायमची बंद - सरनाईक title=
फाईल फोटो

ठाणे: बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या वरच्या थरावर चढविण्यास होत असलेला वाढता विरोध आणि सरावादरम्यान झालेल्या दोन गोविंदांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'नं त्यांच्या दहीहंडीतील स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं 'संस्कृती प्रतिष्ठान'चा दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. ठाण्यातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठेच्या दहीहंड्यांपैकी एक अशी ही हंडी मानली जाते. बक्षिसांची लयलूट करणारी ही हंडी फोडण्यासाठी राज्यभरातून मंडळे इथं हजेरी लावतात. 

गोपाळकाल्याच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ही हंडी फोडण्यासाठी मंडळांमध्ये चढाओढ लागलेली असते. मात्र आता यापुढं ही चढाओढ कायमची बंद करण्याचा निर्ण आमदार सरनाईक यांनी घेतलाय. ठाण्यात पत्रकार परिषदेत आज त्यांनी ही माहिती दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.