रत्नागिरी शिवसेनेचा मोर्चा, पोलिसांची जमाव बंदी

जिल्ह्यातील नियोजित जैतापूर अणुऊर्जा वीज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी, शिवसेना आज मोर्चा काढणार आहे. दरम्याान, पोलिसांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.

Updated: Mar 19, 2015, 10:08 AM IST
रत्नागिरी शिवसेनेचा मोर्चा, पोलिसांची जमाव बंदी title=
जैतापूर प्रकल्प कार्यालयासमोर बांबूची सुरक्षा

रत्नागिरी : जिल्ह्यातील नियोजित जैतापूर अणुऊर्जा वीज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी, शिवसेना आज मोर्चा काढणार आहे. दरम्याान, पोलिसांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.

रत्नागिरी-कुवारबांव इथल्या अणुऊर्जा प्रकल्प कार्यालयावर, हा मोर्चा काढला जाणार आहे.. यावेळी शांतता, कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबांव कार्यालय परिसर, माडबन इथला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, या भागांत, जमावबंदी तसंच प्रवेशबंदीचे आदेश दिलेत. 

दोन दिवसां आधीची १७ मार्च ही तारीख या जनआंदोलनासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आली होती. मात्र आयत्या क्षणी ती तारीख पुढे ढकलण्यात आलीय. तर शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपनं या जनआंदोलनावरुन, शिवसेनेवर टीकेची झोड उठवलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.