मुंबईत सेनेला पाठिंबा देण्याबाबत पवारांची गुगली

मुंबई महापालिकेमध्ये आपल्याच पक्षाचा महपौर व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजप जोरदार प्रयत्न करत आहेत.

Updated: Feb 26, 2017, 06:54 PM IST
मुंबईत सेनेला पाठिंबा देण्याबाबत पवारांची गुगली title=

मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये आपल्याच पक्षाचा महपौर व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजप जोरदार प्रयत्न करत आहेत. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगली टाकला आहे. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.  मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे निवडणुकीत ८४ नगरसेवक तर भाजपचे ८२ नगरसेवक जिंकले. अपक्षांचा पाठिंबा बघता शिवसेनेकडे आता ८८ नगरसेवक आहेत. बहुमताचा आकडा गाठून आपल्याच पक्षाचा महापौर बसवण्यासाठी ११४ नगरसेवकांची गरज आहे, त्यामुळे महापालिकेतला सत्तास्थापनेचा गोंधळ कायम आहे.