नाशिक : कांद्याबाबत सध्या सर्वाधिक धक्कादायक स्थिती आहे असं म्हणून शरद पवारांनी सरकारवर तोफ डागली आहे. 15 दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे दिल्लीत यासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीला राज्याचे पणनमंत्री सुभाष देखमुख, सदाभाऊ खोत उपस्थित होते. त्यावेळी नाफेडमार्फत कांदा खरेदीचा निर्णय झाला होता, पण राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नाही त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याबाबत सरकार किती गंभीर आहे ते कळतं असं पवार म्हणाले.
हा विलंब शेतक-यांचे संसार उध्वस्त कऱणारा आहे त्यामुळे सरकारने तातडीने हा प्रस्ताव पाठवावा किंवा दुसरा काहीतरी पर्याय द्यावा असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे.