कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या गर्भलिंग चाचणीसंदर्भात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. जुना वाशी नाका परिसरात आलिशान टोयाटो कॅमरी कारमध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचं उघड झाल्यानंतर हे जाळं पश्चिम महाराष्ट्रात पसरल्याचं समोर आलंय.
आत्तापर्यंत याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली असून दोन चायना मेड सोनोग्राफी मशीनही जप्त करण्यात आलंय. डॉ. हिंदूराव पवार, डॉ. हर्षल नाईक, चालक सुशांत दळवींसह सांगली जिल्ह्यातल्या कासेगावमधले डॉक्टर विक्रम आडकेंना अटक करण्यात आली आहे.
त्यांनी बेकायदा सोनोग्राफी करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एजंट नेमले होते. एजंट गजेंद्र कुसाळेलाही गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय. या कारवाईमुळे रॅकेटची पाळंमुळं किती खोलवर रुजलीयत ते समजण्यास मदत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.