नाशिकमध्ये मोठे सेक्स रॅकेट उद्धवस्त...

नाशिक पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय. अल्पवयीन मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची परराज्यात लाखो रुपयांनी विक्री केली जायची. एका पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी एका महिलेसह तिघा संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे. यांच्यासारखेच अजून २० एजंट मुलींची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Updated: May 25, 2016, 05:23 PM IST
नाशिकमध्ये मोठे सेक्स रॅकेट उद्धवस्त... title=

नाशिक : नाशिक पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय. अल्पवयीन मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची परराज्यात लाखो रुपयांनी विक्री केली जायची. एका पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी एका महिलेसह तिघा संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे. यांच्यासारखेच अजून २० एजंट मुलींची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कसे होते सेक्स रॅकेटचे स्वरुप

पीडित तरुणीला विचारले असता ती म्हणाली, चार वर्षांपूर्वीच सुनीता गोराणे या महिलेने घरी येऊन माझ्या आईला माझ्यासाठी लग्नाचे स्थळ आणून दिले. मात्र लग्नाला नकार असूनही माझे लग्न नितीन जैन या परक्याच व्यक्तीसोबत लावून मला राजस्थानात नेण्यात आले. थोड्या दिवसांनंतर नितीन याने तुला पाच लाखांना विकत घेतल्याचे सांगून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला जबरदस्ती करण्यात आली.

कशी झाली सुटका...

४ वर्षांत मला दोन मुले झाली मात्र नितीनकडून मानसिक आणि शारीरिक अत्याचार होत गेले. मला कायम एका खोलीत डांबून ठेवले जायचे. एक दिवस मात्र हिंमत करुन, शेजाऱ्यांची मदत घेऊन मी नाशिकला परतले आणि झालेल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. माझ्या सारख्याच अशा अनेक जणांचा व्यवहार होत असेल म्हणून मी झालेला प्रकाराची पोलिसांकडे तक्रार केली.

सेक्स रॅकेट चालविणारी गजाआड

संशयित सुनीता गोराणे हीला ताब्यात घेतले आहे. या प्रकणात मोठ रँकेट उघडकीस येवून १० ते १५ पीडित मुली मिळण्याची शक्यता आहे.