दैव बलवत्तर...नवी मुंबईत सातव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा सुखरुप

'देव तारी त्याला कोण मारी' असेच काही एका तीन वर्षांच्या मुलाबरोबर घडलेय. कलंबोली सेक्टर- १५ येथे राहणाऱ्या मिश्रा कुटुंबातील तीन वर्षांच्या आशिष मिश्रा हा मुलगा सातव्या मजल्यावरुन खाली पडला, पण दैव बलवत्तर म्हणून आशिष सुखरूप वाचला.

Updated: Dec 3, 2015, 04:14 PM IST
दैव बलवत्तर...नवी मुंबईत सातव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा सुखरुप title=

नवी मुंबई : 'देव तारी त्याला कोण मारी' असेच काही एका तीन वर्षांच्या मुलाबरोबर घडलेय. कलंबोली सेक्टर- १५ येथे राहणाऱ्या मिश्रा कुटुंबातील तीन वर्षांच्या आशिष मिश्रा हा मुलगा सातव्या मजल्यावरुन खाली पडला, पण दैव बलवत्तर म्हणून आशिष सुखरूप वाचला.

कलंबोली सेक्टर १५मधील कृष्णापार्क या टॉवरमध्ये मिश्रा कुटुंब सातव्या मजल्यावर राहते. बुधवारी सायंकाळी आशिष आपल्या घराच्या बाल्कनीत खेळत होता. यावेळी त्याची आई घरात काम करत होती. खेळता खेळता बाल्कनीच्या ग्रीलमधून तो खाली पडला. आशीष सातव्या मजल्यावरुन पाचव्या मजल्याच्या शेडवर पडला आणि शेडवरुन कंपाउंड वालच्या बाहेर फेकला गेला तो मातीवर पडला.

घटना घडल्यावर तात्काळ त्याला वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. पण आशिष डोक्याला आणि हाताला मार लागला असून त्याच्या जीवास धोका नाही. यामुळे मिश्रा कुटुंब देवाचे आभार मानले आहेत.

एवढ्या उंचीवरुन पडून देखील आशिषला जास्त दुखापत झाली नसल्याने डॉक्टरांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलेय. आशिषला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.