पुणे : के. मुरलीधरन आणि सी पी इस्माइल या दोघा माओवाद्यांना पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. या दोघांना एटीएस कोठडी सुनावण्यात आलीय.
१५ मे पर्यंत त्यांना एटीएस कोठडीमध्ये रहावं लागणार आहे. या दोघांना शुक्रवारी पहाटे तळेगांव दाभाडे इथून अटक करण्यात आली होती.
या दोघांपैकी के. मुरलीधरन हा गेली ३५ वर्ष नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. नक्षलवाद्यांकडून घडवण्यात आलेल्या हत्येमध्ये तो संशयित आरोपी आहे. ६२ वर्षांचा मुरलीधरन नक्षलवाद्यांच्या दक्षिणेतील करवायाचं नेतृत्व करतो.
केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये नक्षलवादी कारवाया घडवण्यात त्याची मुख्य भूमिका आहे. गेल्या अनेक वर्ष वॉन्टेड आहेत एटीएसच्या पुणे शाखेने त्याला त्याच्या साथीदारसह तळेगाव परिसरातून अटक केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.