डोंबिवली : एका वृद्धाला लोकलमधून ढकलून दिल्याची घटना घडलीय. सीएसटी येथून सुटलेल्या कसारा लोकलमध्ये ही घटना घडलीय.
नंदकुमार जोशी या ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीला एका २४ वर्षीय युवकाने डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान लोकल मधून ढकलले. या घटनेत जोशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गंभीर जखमी असलेले नंदकुमार जोशी हे ठाणे कोर्टात कार्यरत आहेत. सीएसटी-कसारा लोकलने घरी येत असताना डोंबिवली स्थानकावर एक तरुण लगेज घेवून चढ़ला. त्या लगेजचा त्रास होत असल्याने जोशी यांनी त्याला हटकले. यावेळी, डब्यात असलेल्या पोलिसांनी युवकास मारहाण केली. मारहाण झाल्याचा राग मनात धरून तरुणानं जोशी यांना भरधाव लोकलमधून ढकलून दिले.
जोशी यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने ते विकलांग डब्यात प्रवास करत होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी जोशी लोकलमधून पडल्याचे सांगत धक्काबुक्कीची घटना नाकारलीय.
जोशी हे कल्याण-मुरबाड़ रोड वरील म्हारळ गावातील रहिवासी आहेत. रेल्वे पोलिसांनी युवकास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.