ऊस दराबाबतची दुसरी बैठकही निष्फळ

ऊस दर ठरवण्याबाबत मंगळवारी दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही दराबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. 

Updated: Nov 1, 2016, 08:49 PM IST
ऊस दराबाबतची दुसरी बैठकही निष्फळ title=

कोल्हापूर : ऊस दर ठरवण्याबाबत मंगळवारी दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही दराबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. 

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी आज बोलावण्यात आलेली दुसरी बैठकही निष्फळ ठरली. उसाला 3200 रूपये पहिली उचल मिळायलाच हवी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अडून बसलीय. 

एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यास कारखानदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पण 3200 रूपयांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना हटून बसल्यानं तिढा अजून सुटलेला नाही. 

दरम्यान, 'ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी संघटनेनं अजून आंदोलन पुकारलेलं नाही. आम्ही आंदोलन केलं तर भडका उडेल', असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिलाय. 

तर तोडग्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. तोडगा काढण्यासाठी उद्या बुधवारी पुन्हा तिसरी बैठक होणार आहे.