सप्तश्रृंगी गडावर गनलोड करताना चुकून फायरिंग, १० जखमी

सप्तश्रृंगी गडावर ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकाकडून अचानक जमिनीवर १ राऊंड फायर झालेल्या दुर्घटनेत १० जण जखमी झाले आहे. सप्तश्रृंगी गडावर विजयादशमीच्या दिवशी बोकड बळी देण्याची प्रथा आहे.

Updated: Oct 12, 2016, 09:59 AM IST
सप्तश्रृंगी गडावर गनलोड करताना चुकून फायरिंग, १० जखमी title=

नाशिक : सप्तश्रृंगी गडावर ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकाकडून अचानक जमिनीवर १ राऊंड फायर झालेल्या दुर्घटनेत १० जण जखमी झाले आहे. सप्तश्रृंगी गडावर विजयादशमीच्या दिवशी बोकड बळी देण्याची प्रथा आहे.

याच वेळी ट्रस्टच्यावतीने हवेत दोन राऊंड फायर करून मानवंदना दिली जाते. हा कार्यक्रम सुरु असतांना ट्रस्टचा सुरक्षा रक्षक गन लोड करीत असतांना भाविकांचा धक्का लागल्याने  रायफलमधून जमिनीवर एक राऊंड फायर झाला. 

राऊंडच्या  झऱ्यांमुळे  १० जण गंभीर जखमी झाले आहे जखमींमध्ये ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकाची संख्या जास्त आहे. सुदैवाने या घटनेत  कुठलीही जिवीत हानी झाली नाही.