सांगली : वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी सांगलीकरांनी तब्बल दोन कोटी रुपये मोजलेत आरटीओच्या या सुविधेमुळे शासनाच्या तिजोरीतही कोट्यवधींची रक्कम जमा झालीय.
प्रेक्षकहो, हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं. सांगलीकरांनी ही उक्ती खरी करुन दाखवलीय... वाहनांच्या हव्या त्या नंबर्ससाठी सांगलीकरांनी तब्बल 2 कोटींची रक्कम मोजलीय. तीही केवळ आठ महिन्यात. आकर्षक नंबरच्या सुविधेद्वारे व्हीआयपी, फॅन्सी, जंपिंग, मिरर, गोल्ड नंबर्स सांगलीकरांनी मिळवलेत.
जनतेच्या मागणीचा विचार करुन आरटीओतर्फे 2013 पासून आकर्षक नंबरची सुविधा सुरू करण्यात आली...त्या सुविधेमध्ये नंबर्ससाठी वेगवेगळी फी आकारली जाते. त्यात तीन हजार रुपयांपासून तीन लाखांपर्यंत फी ठेवण्यात आलीय. या वर्षांत आत्तापर्यंत 2700 जणांनी दोन कोटी खर्च करुन आपल्याला हवे असणारे नंबर घेतलेत. आरटीओच्या या सुविधेद्वारे लोकांना हवे ते नंबर तर मिळतातच पण त्याचबरोबर शासनाच्या तिजोरीतही कोट्यवधींची रक्कम जमा होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.