समीर गायकवाडची होणार नार्को, ब्रेन मॅपिंग टेस्ट

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सध्या अटकेत असणारा सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाड हा चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे एसआयटीने त्याची नार्को, ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Sep 25, 2015, 10:42 AM IST
समीर गायकवाडची होणार नार्को, ब्रेन मॅपिंग टेस्ट title=

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सध्या अटकेत असणारा सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाड हा चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे एसआयटीने त्याची नार्को, ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय.

समीर तपासात सहकार्य करीत नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीचे बैठक घेतली. दरम्यान, त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर त्याच्यासंबंधचा गुजरात फॉरेन्सिक लॅबचा  अहवाल तयार असून तो दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.

पानसरे यांच्या हत्येच्या तपासात पोलिसांनी प्रथमपासून पारंपरिक तपासाबरोबर सायबर सेलचा आधार घेतलाय. सायबर सेलने संशयित समीरच्या मोबाईलवर टेक्निकल सर्व्हेलन्सद्वारे नजर ठेवली होती. यातून समीर संभाषणात पानसरे हत्येसंबंधीचा उल्लेख आढल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला अटक झाली. समीरचे ज्यांच्याशी बोलणे झालेय. त्यांचीही चौकशी होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.