शंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!

आज गुरुपौर्णिमा... शिर्डीतही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय… गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी सजलीय. देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.

Updated: Jul 12, 2014, 09:19 AM IST
शंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली! title=

शिर्डी : आज गुरुपौर्णिमा... शिर्डीतही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय… कालपासून शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालीय.. या उत्सवानिमित्त साईनगरी सजलीय. देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.

साईबाबा हयात असताना काही भक्तांनी साईबाबांना गुरू म्हणून पुजण्याची परवानगी मागितली होती. साईंनी प्रथम द्वारकामाईतल्या एका खांबाला आणि नंतर स्वतःला पुजण्याची परवानगी दिली होती. तेव्हापासून शिर्डीत व्यास पौर्णिमा अर्थात गुरूपौर्णिमेच्या दिवशी लाखो साईभक्त बाबांच्या दर्शनाला येत आहेत.

देशाविदेशातले हजारो भक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. तीन दिवस हा गुरूपौर्णिमा उत्सव चालतो. सकाळी काकड आरतीने उत्सवाला सुरूवात झाली. नंतर सरईबाबांचा फोटो, पोथी आणि पादुकांच्या मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर साईचरित्राच्या अखंड पारायणाची सुरूवात करण्यात आली. 
 
रामनवमी आणि गुरूपौर्णिमेला साईंच्या दर्शनासाठी चालत येण्याची प्रथा आहे. देशाच्या अनेक भागातून साईंच्या पालख्या शिर्डीत दाखल होतात. यावेळी, पुण्यातून आलेली पालखी विशेष होती. पालखीला केलेली आकर्षक सजावट तसंच साईंविरोधात वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांचा निषेध करणारे फलक लक्ष वेधून घेत होते. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.