औरंगाबाद: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्र्सत वाकाला गावाला आपल्या खासदार निधीतून एक कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. पण गावकऱ्यांमधल्या भांडणामुळे हा निधी तसाच पडून आहे.
हा निधी कसा वापरायचा याबाबत गावकऱ्यांनी बैठक घेऊन टेंडरबाबतचा निर्णय घ्या, असा सल्ला सचिननं दिला होता. पण गावाकऱ्यांमधल्या जात आणि धर्माच्या मतभेदांमुळे हा निधी अजूनही तसाच पडून आहे. 2014 मध्ये सचिननं हा निधी द्यायची घोषणा केली होती.
वाकाला ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या हत्तेसिंग चौधरी यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या गावामध्ये जात आणि धर्मावरून कोणतेही वाद नाहीत. हा निधी वापरण्यात आला नाही कारण राजकीय पक्षांमध्ये मतभेद होते, पण आता हा वाद मिटला आहे, असं हत्तेसिंग चौधरी म्हणाले आहेत.