निजामाच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री कसे?

सत्तेमध्ये असूनही शिवसेना केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही.

Updated: Jun 12, 2016, 05:37 PM IST
निजामाच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री कसे? title=

नागपूर : सत्तेमध्ये असूनही शिवसेना केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही. केंद्रातलं सरकार हे निजामाच्या बापाचं असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. या वादामध्ये आता आरएसएसनंही उडी घेतली आहे. 

संघाचं मुखपत्र असलेल्या तरुण भारतमधून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. निजामाच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री कसे असा सवाल तरुण भारतमध्ये विचारण्यात आला आहे. तसंच भाजप निजाम तर रझाकार कोण? जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत दलित वस्त्यांवर हल्ला करणारे का कोणतंही आंदोलन करून हफ्ता मागणारे? अशी जोरदार टीका तरुण भारतमध्ये करण्यात आली आहे.  

नागपूर तरुण भारतच्या प्रहार या सदरामध्ये हा लेख लिहीण्यात आला आहे. बावचळलेल्या सेनेचा तोल सुटला या शिर्षकाखाली हा लेख लिहीण्यात आला आहे.