शिर्डी : पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय.
अवघ्या तीन दिवसांत ५ लाख ८ हजार २०० रुपयांच्या नवीन नोटा साईंच्या दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेल्या आढळल्यात. तर साईबाबांच्या हुंडीत तीन दिवसांत २००० रुपयांच्या २७१ नविन नोटा आढळल्यात. तसंच मंदिर परिसरातील देणगी काउंटरवर दोन हजारांच्या ३१ नवीन नोटा दिल्या गेल्या
साई मंदिरातील दानपेट्यातील रोख रकमेची आठवड्यातून दोनदा मोजदाद होते.