कोकण कृषी विद्यापीठात १०० जागांची भरती

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अंतिम तारीख २० जानेवारी आहे.

Updated: Jan 8, 2015, 09:58 PM IST
कोकण कृषी विद्यापीठात १०० जागांची भरती title=

मुंबई : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अंतिम तारीख २० जानेवारी आहे.

कार्यालय अधीक्षक - २ जागा, लघुटंकलेखक आणि कनिष्ठ लघुलेखक -२, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - ३, कनिष्ठ अभियंता (विद्युत) -१, वरिष्ठ लिपिक -१०, आरेखक स्थापत्य -२, कनिष्ठ अभियंता - स्थापत्य २, आरेखक-यंत्रयांत्रिकी-१, अनुरेखक -१, वीजयंत्री -१, सुतार -१, दृकश्राव्यचालक -१, कृषी साहाय्यक ग्रंथपाल-१, शास्त्रीय उपकरणे तंत्रज्ञ-१, साहाय्यक सुरक्षा अधिकारी -१,  प्रयोगशाळा साहाय्यक-पी.एच.एम-२, प्रशीतन /शीतगृह चालक -२, नळ कारागीर - १, गीयर टेक्निशियन-१, यंत्रचालक बोट-२, कुशल मासेमार-४, तांडेल-४, बोटमन/डेकहॅन्ड-५, वरिष्ठ प्रयोगशाळा साहाय्यक-मत्स-१, खानसामा-१, माळी-१, सफाई-३, मजूर-९, बैलवाल-२, दुधवाला-१, नांगरवाला-१, वासरेवाला-१, शिपाई-५, प्रयोगशाळा सेवक-४, प्रयोगशाळा परिचर-२, पहारेकरी-२ या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०१५ आहे. अधिक माहिती http://www.dbskkv.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.