'रोटी बँके'ची आयडियाची भन्नाट कल्पना!

आपल्या रोजच्या जीवनात असे कितीतरी लोक दिसतात की ज्यांना दोन वेळंच काय एक वेळचंही अन्न मिळत नाही... आणि कितीतरी समारंभांमध्ये उरलेलं अन्न फेकून दिल जातं. पण यावरचं एक चांगला उपाय औरंगाबादमध्ये शोधण्यात आलाय. यामुळे उरलेलं अन्न वायाही जात नाही आणि गोरगरीब माणूस उपाशीही राहात नाही.

Updated: Dec 22, 2015, 01:23 PM IST
'रोटी बँके'ची आयडियाची भन्नाट कल्पना! title=

विशाल करोळे, औरंगाबाद : आपल्या रोजच्या जीवनात असे कितीतरी लोक दिसतात की ज्यांना दोन वेळंच काय एक वेळचंही अन्न मिळत नाही... आणि कितीतरी समारंभांमध्ये उरलेलं अन्न फेकून दिल जातं. पण यावरचं एक चांगला उपाय औरंगाबादमध्ये शोधण्यात आलाय. यामुळे उरलेलं अन्न वायाही जात नाही आणि गोरगरीब माणूस उपाशीही राहात नाही.

बँक म्हटलं तर डोळ्यापुढे सर्वसाधारणपणे पैशांच्यां बँकेचं चित्र येतं. पण आज आम्ही बोलत आहोत रोटी बँकेविषयी... आश्चर्य वाटलं ना... पण, औरंगाबादमध्ये अशी एक बँक सुरू करण्यात आलीय. या बँकेतून भुकेलेल्यांना जेवण मिळतं. सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत या बँकेत उपाशीतापाशी लोकांना जेवण दिलं जातं. २५० जणांनी रोटी बँकेत आतापर्यंत नोंदणी केलीय. रोज या बँकेत हे लोक अन्न आणून देतात. हे अन्न मग फ्रीजमध्ये ठेवलं जातं. येणाऱ्या प्रत्येक भुकेलेल्याला मग तपासणी करून हे जेवण दिलं जातं.

निराधार महिलांनाही रोटी बँकेचा मोठा आधार वाटतो.  हाताला काम नसलेल्यांनाही ही बँक म्हणजे वरदान वाटतेय. कुणीही उपाशी राहु नये म्हणून रोटी बँक सुरू केल्याचं संस्थेचे पदाधिकारी युसूफ मुक्ती यांनी म्हटलंय.  

फक्त घरात उरलेलंच नाही तर लग्न समारंभातलही उरलेलं अन्न संस्थेत नेण्याची सोय रोटी बँकेच्या माध्यमातून करण्यात आलीय. समाजसेवेचा याहून चांगला पर्याय कुठला बरं असू शकतो.