दरोड्यादरम्यान महिलेची हत्या, पोलिसांचा तपास सुरु

कल्याणनजिक शहाडमध्ये दरोडा टाकून तरुणीची हत्या करण्यात आलीय. प्रिया दरवाडे असं या तरुणीचं नाव आहे.

Updated: Apr 15, 2016, 03:36 PM IST
दरोड्यादरम्यान महिलेची हत्या, पोलिसांचा तपास सुरु title=

कल्याण : कल्याणनजिक शहाडमध्ये दरोडा टाकून तरुणीची हत्या करण्यात आलीय. प्रिया दरवाडे असं या तरुणीचं नाव आहे.

साईधाम इमारतीमध्ये प्रिया यांच्या भावाचा फ्लॅट आहे. रात्रीच्या वेळी शेजारच्या इमारतीमधून विवेक यांना चोर-चोर असा आरडाओरडा ऐकू आला... काय घडलंय ते पाहण्यासाठी त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, त्यांच्या बेडरूमला बाहेरून कडी घालण्यात आली होती. अखेर त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला. त्यांना दरवाजा फोडला असता बाहेरच्या खोलीत प्रिया मृत अवस्थेत आढळून आली. खोलीत सुरू असलेल्या पंख्याच्या आवाजामुळे बाहेरच्या खोलीत काय घडलं याचा अंदाज आला नाही, असं विवेक यांनी म्हटलंय.

प्रियावर शारीरिक अत्याचार?

शव विच्छेदनानंतरच प्रियावर शारिरीक अत्याचार झालाय का, हे समजू शकेल असं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान, विवेक यांच्या पत्नीचं मंगळसूत्र आणि प्रियाची सोनसाखळी चोरीला गेलीय.

गेल्या आठवड्यात याच परिसरात एका वॉचमनचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळं परिसरात भीतीच वातावरण आहे.