नागपुरात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

नागपूरच्या कन्हान गावात आज दुपारी जवेलर्सच्या दुकानवार दरोडा टाकून गोळीबार करण्यात आला... दरोड्याला विरोध करणाऱ्या दुकान मालकावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने दुकान मालक जखमी झाला... 

Updated: May 14, 2017, 08:30 PM IST
नागपुरात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा title=

नागपूर : नागपूरच्या कन्हान गावात आज दुपारी जवेलर्सच्या दुकानवार दरोडा टाकून गोळीबार करण्यात आला... दरोड्याला विरोध करणाऱ्या दुकान मालकावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने दुकान मालक जखमी झाला... 

अमित गुप्ता असे जखमी दुकानदाराचे नाव असून उपचारासाठी त्याला कामठी गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... कन्हान येथे अमित ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे...

आज दुपारी दुकान सुरु असताना 3 ते 4 दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करून धारदार शस्त्रे आणि बंदुकीच्या जोरावर लूटमार सुरु केली...यावेळी दुकानात ग्राहक देखील होते... हातात मिळेल ते सर्व दागिने सोबत आणलेल्या बॅग टाकणे त्यांनी सुरु केले.

त्यावेळी दरोदेखोरांना विरोध केल्याने एक दरोडेखोराने अमित गुप्ता यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला. यानंतर त्य़ा दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. या दरोड़यात 15 ते 20 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.