'तीन हात नाका' चौकाचे 'मराठा क्रांती चौक’नामकरण करण्याची मागणी

संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंगावत असतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी एक नवी मागणी केलीये.

Updated: Nov 7, 2016, 02:07 PM IST
'तीन हात नाका' चौकाचे 'मराठा क्रांती चौक’नामकरण करण्याची मागणी title=

ठाणे : संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंगावत असतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी एक नवी मागणी केलीये.

ठाण्यातील तीन हात नाका चौकाचे 'मराठा क्रांती चौक’असे नामकरण करावे अशी मागणी या आयोजकांनी पत्राद्वारे महापौरांकडे केलीये. 

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यभरात मराठा समाजाचे मूक मोर्चे निघतायत. यात कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी, तसेच अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, आरक्षण या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने मोर्चे निघाले होते.

मुंबईतही रविवारी या मोर्चाची रंगीत तालीम म्हणून बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मोठ्या संख्येने बाईकस्वार सहभागी झाले होते.