पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये.
शिरुर येथे राहणाऱ्या सीताराम घावटे या आरोपी पतीला याप्रकरणी अटक करण्यात आलीये. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपी पतीने साडीच्या सहाय्याने तिचा गळा आवळला.
इतक्यावरच तो नराधम थांबला नाही तर कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने पत्नीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर शेतात टाकून दिला.
पोलिसांना शेतात हा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास केल्यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आलीये.