पुणे : मुंबई, पुण्यात साध्य भाड्याने घर घ्यायचं म्हटलं तरी नाकीनऊ येतात. त्यात दलाल लोक हैराण करतात. रिअल इस्टेटमध्ये दलालांचा सुळसुळाट दिसून येत आहे. अव्वाच्या सव्वा दर सांगून जास्तीचे कमिशन लाटण्यासाठी दलाल लॉबी सक्रीय झाली. आता या दलालांशिवाय भाड्याचे घर किंवा नविन घर घेणे शक्य होणार आहे. 'नोब्रोकर डॉट कॉम'ने ही संधी उपलब्ध करुन दिलेय.
घराची विक्री असो किंवा घर भाड्याने देणे-घेणे असो, मालक आणि ग्राहक यांना जोडण्यासाठी एखाद्या दलाल किंवा एजंटरूपी मध्यस्थाची गरज अनेकांना भासते. अशा व्यवहारात संबंधित मध्यस्थाला मोठ्या प्रमाणात ब्रोकरेज किंवा कमिशन द्यावे लागते. रिअल इस्टेटमधील व्यवहार अनेकवेळा दलालांशिवाय चालत नाहीत. यामध्ये भरडला जातो तो घर घेणारा. दलाल लोक २ कमिशन घेतात. तसेच घर व्यवहारात २ ते अडीच टक्के रक्कमेची मागणी केली जाते. त्यामुळे 'भिक नको कुत्रा' आवर अशी गत घर घेणाऱ्याची होती. आता दलालीला चाप बसणार आहे.
दलालीची बाब लक्षात घेऊन 'नोब्रोकर डॉट कॉम'ने अत्याधुनिक तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण कल्पनेसह नवी यंत्रणा विकसित केली आहे. ही सुविधा बंगळूर, मुंबईपाठोपाठ नुकतीच पुण्यातही उपलब्ध झाली असून, वर्षभरात देशातील २० प्रमुख शहरांत ती पोचविली जाणार आहे. अमित कुमार, अखिल गुप्ता या आयआयटी, आयआयएम पदवीधर तरुणांनी ही नवी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. नावाप्रमाणेच "नोब्रोकर डॉट कॉम‘ हा एक ब्रोकरमुक्त प्रॉपर्टी सर्च पोर्टल आहे, जे ब्रोकरला दूर ठेवत घरमालक आणि भाडेकरू यांचा एकमेकांशी संपर्क करून देते, तसेच भाडेकराराची नोंदणी करण्यासाठीसुद्धा मदत करते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.