अजब-गजब! गौरीला मटणाचा नैवेद्य!

कोकणात सध्या गौरी-गणपतीच्या सणाची धूम सुरू आहे. लाडक्या गौराईचंही आगमन झालंय... अशावेळी महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गौराईला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराचे नैवेद्य दाखवले जातात. 

Updated: Sep 21, 2015, 11:58 AM IST
अजब-गजब! गौरीला मटणाचा नैवेद्य! title=

रत्नागिरी : कोकणात सध्या गौरी-गणपतीच्या सणाची धूम सुरू आहे. लाडक्या गौराईचंही आगमन झालंय... अशावेळी महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गौराईला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराचे नैवेद्य दाखवले जातात. 

गौरीला भाजी भाकरीबरोबरच गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु मुरूड तालुक्यातील त्वष्टा कासार समाजात गौरीला चक्क मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. 

पूर्वांपार चालत आलेली ही प्रथा या समाजाने आजही जपली आहे. गौर ही आपली बहिण म्हणून पाहुणी येते आणि तिचा पाहुणचार दणक्यात झाला पाहिजे या भावनेतून ही परंपरा सुरू आहे.

शाकाहार-मांसाहार वाद चर्चेत असताना आणि कालानुरूप प्रथा परंपरा मोडीत निघत असताना त्वष्टा कासार समाजाने ही प्रथा आजही जपली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.