गोरगरीबांच्या घरात बापटांची डाळ शिजत नाहीय

स्वस्त धान्य दुकानात बाजारपेठेपेक्षा महाग दरात तूरडाळ विकली जातेय. डाळीचे दरही जास्त, दर्जाही नित्कृष्ट असल्याने रेशन दुकानदारांनी डाळ खरेदी करायला नकार दिलाय. त्यामुळे हजारो क्विंटल डाळ गोदामात पडून आहे. 

Updated: Aug 29, 2016, 08:36 PM IST
गोरगरीबांच्या घरात बापटांची डाळ शिजत नाहीय title=

नाशिक : स्वस्त धान्य दुकानात बाजारपेठेपेक्षा महाग दरात तूरडाळ विकली जातेय. डाळीचे दरही जास्त, दर्जाही नित्कृष्ट असल्याने रेशन दुकानदारांनी डाळ खरेदी करायला नकार दिलाय. त्यामुळे हजारो क्विंटल डाळ गोदामात पडून आहे. 

एकंदरीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांच्या खात्याच्या रेशनिंगची डाळ काही शिजत नाहीय. नाशिकमध्ये गोरगरीबांच्या घरात डाळ शिजणार कशी हा प्रश्न कोणालाही प़डेल. कारण बाजारपेठेपेक्षा रेशन दुकानात डाळ महाग आहे. 

दर नियंत्रणात आल्यावर तूरडाळ बाजारपेठेत ८५ ते १२५ रूपयांपर्यंत उपलब्ध आहे. मात्र अंत्योदय योजनेतल्या माध्यमातल्या नागरिकांना डाळ मिळावी म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेली डाळ बाजारपेठेपेक्षा महाग आहे. दर्जाही चांगला नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांनी डाळ उचलण्यास नकार दिलाय. त्यामुळे डाळ गोदामातच पडून आहे. 

भाजप आमदारांनी यासंदर्भात मंत्री गिरीष बापट यांना पत्र लिहून दर्जा सुधारण्याची मागणी केलीय. मात्र या प्रक्रियेत गोरगरीबाच्या ताटातलं वरण मात्र गायब झालंय. 

पाऊस चांगला झाल्याने डाळीचे , डाळीचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता आहे. मात्र रेशनच्या दुकानातही चांगल्या दर्जाची डाळ खरोखर स्वस्तात मिळणं गरजेचं आहे. तसंच सध्या पडून असलेल्या हजारो क्विंटल डाळीचं काय करायचं याचंही उत्तर पुरवठा विभागाला शोधावं लागणार आहे.