मराठवाड्यातील हुंड्याचे रेटकार्ड... तुम्हांला भोवळ येईल...

मराठवाड्यातील लग्नातील हुंड्याचे रेटकार्ड पाहिल्यावर भल्या भल्याला भोवळ येईल अशी परिस्थीती आहे.... पाहूयात कसे आहे रेटकार्ड

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 17, 2017, 05:49 PM IST
 मराठवाड्यातील हुंड्याचे रेटकार्ड... तुम्हांला भोवळ येईल... title=

औरंगाबाद : मराठवाड्यातील लग्नातील हुंड्याचे रेटकार्ड पाहिल्यावर भल्या भल्याला भोवळ येईल अशी परिस्थीती आहे.... पाहूयात कसे आहे रेटकार्ड

सनदी अधिकारी 1 कोटी पर्यंत

डॉक्टर 50 लाख

इंजिनिअर 30 ते 40 लाख

सरकारी नोकरी 20 ते 40 लाख

बँक अधिकारी 30 लाख,

खाजगी नोकरी, पोलिस हवालदार, 10 ते 15 लाख

बीड सारख्या भागातही उसतोड मजूरीला जाणारे 3 लाखापर्यंत हुंडा घेतात आणि देतात...

वयाने जितकी मोठी मुलगी तितका हुंडा जास्त..

जेवढी मुलगी अल्पवयीन आणि गोरी तेवढा हुंडा कमी सुद्धा असतो
काही लग्न ठरवणारे लोक तर हुंडा घेवून देतात आणि कमिशनही खातात...

सगळयाच प्रकारामध्ये 10 लाखांचे लग्न 20 लाखांचे लग्न करून द्यावे अशा पद्धतीची मागणी असते, सोबत 20 तोळ्यांपासून 40 तोळ्यांपर्यंत सोनं मागतात.  

रुखवतामध्ये  अगदी कुकर मिक्सरपासून फ्रीज, वॉशिंग मशीन आणि चारचाकी काही ठिकाणी फ्लॅटची सुद्धा मागणी होते, पुरावा राहू नये म्हणून बहुतांश ठिकाणी आता हुंडा पैसै मुलीच्या नावावर, वस्तू सुद्धा मुलीच्या नावावर घेण्यात येतात.