लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीवर बलात्कार

पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना पालघरमध्ये घडली आहे. एका नवविवाहितेसोबत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बलात्कार झाला आहे. पीडित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या या कृत्यात त्याला साथ देणाऱ्या पतीला अटक केली आहे. 

Updated: Jul 12, 2016, 01:01 PM IST
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीवर बलात्कार title=

पालघर : पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना पालघरमध्ये घडली आहे. एका नवविवाहितेसोबत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बलात्कार झाला आहे. पीडित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या या कृत्यात त्याला साथ देणाऱ्या पतीला अटक केली आहे. 

पालघरमधील २२ वर्षीय तरुणीची ७ जुलै २०१६ ला विवाह झाला. तरुणीची आई लहानपणीच तिला सोडून गेली आणि वडील दारुड्या होत्या.

नवविवाहित या तरुणीसोबत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पती आणि तिच्या मेव्हुण्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने तेथून पळ काढला. त्यानंतर या मुस्लीम तरुणीने शिवशक्ती संघटनेच्या मदतीने तरुणी पोलिसांपर्यंत पोहोचली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली आणि त्यांची चौकशी करत आहेत.