राणेंनीच MIMला 5 कोटींची ऑफर दिली - रामदास कदम

काँग्रेसचे पराभूत उमेदवार नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राणेंनी माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. MIM हाच शिवसेनेचा नंबर वन शत्रू आहे. राणेच MIM ला कोट्यवधी रूपये देणार होते, असा भडीमार कदम यांनी केलाय. 

Updated: Apr 17, 2015, 04:15 PM IST
राणेंनीच MIMला 5 कोटींची ऑफर दिली - रामदास कदम title=

औरंगाबाद: काँग्रेसचे पराभूत उमेदवार नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राणेंनी माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. MIM हाच शिवसेनेचा नंबर वन शत्रू आहे. राणेच MIM ला कोट्यवधी रूपये देणार होते, असा भडीमार कदम यांनी केलाय. 

राणेंच्या टिल्लू पिल्लूंनी शांत रहावं, उगीच बडबड करु नये, असा टोलाही त्यांनी लगावलाय. एमआयएम ही पार्टी शिवसेनेचंच पिल्लू आहे, या नितेश राणेंच्या टीकेला कदमांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. 

वांद्रे पूर्व इथल्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि एमआयएमचं सेटिंग झालं होतं, निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी एमआयएमचे आमदार रामदास कदम यांच्या कॅबिनमध्ये बसल्याचं अनेकांनी पाहिलं होतं, असा आरोप नितेश राणे यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना रामदास कदम यांनी राणेंवरच पलटवार करत राणेंनीच एमआयएमच्या आमदारांना पाच-पाच कोटींची ऑफर दिल्याची माहिती आहे, असं सांगितलं. तसंच राणेंच्या मुलांना आम्ही किंमत देत नाही, असंही ते म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.