नाशिक : खासदार सुप्रिया सुळे यांनी तंबाखू सेवनाच्या विरोधात राज्यभरात सामाजिक आंदोलन छेडले आहे. येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तंबाखूसेवन करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
लहानपणापासूनच मुलांनी तंबाखूच्या व्यसनापासून परावृत्त व्हावं या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिक इथं तंबाखूविरोधी मोहिमेचं आयोजन करण्यात आले.
तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी शालेय विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली. यावेळी तंबाखूसेवन करणार नाही आणि व्यसनापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. शालेय वयात मुलांमध्ये तंबाखूच्या भयानक दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण केल्यास खऱ्या अर्थाने व्यसनमुक्ती होऊ शकेल, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय.
आर.आर.पाटलांच्या म्हणजे आबांच्या अकाली निधनाने व्यसनांचे गंभीर दुष्परिणाम आपल्या सर्वांच्या समोर आले आहे. तंबाखू सेवनाचे होणारे गंभीर दुष्परिणाम शालेय वयातच विद्यार्थ्यांना कळावे यासाठी त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी तंबाखूसेवन करणार नाही आणि व्यसनापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.