राणा आणि पाठकबाईंच्या उपस्थितीत रंगली महिला दिन रॅली

जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूरात खास रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचं मुख्य आकर्षण होतं राणा आणि पाठकबाई.

Updated: Mar 9, 2017, 01:48 PM IST
राणा आणि पाठकबाईंच्या उपस्थितीत रंगली महिला दिन रॅली title=

कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूरात खास रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचं मुख्य आकर्षण होतं राणा आणि पाठकबाई.

कोल्हापूरमधला महिला दिन असा खास होता. तुझ्यात जीव रंगलाचा रांगडा गडी राणा आणि पाठकबाईंच्या उपस्थित महिला दिन साजरा करण्यात आला.

महिला दिनानिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून रॅलीला काढण्यात आली होती. त्यात विविध शाळांच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता. झांज पथक, लेझीम पथकांनी उपस्थितांची चांगलीच वाहवा मिळवली. कार्यक्रम ऐन रंगात येताच व्यासपीठावर आगमन झालं ते सर्वांच्या लाडक्या राणा आणि पाठकबाईंचं. राणा आणि पाठकबाईंनी खास महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या...

प्रतिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही महारॅली काढण्यात आली होती. ज्यात कोल्हापुरातील सर्वच स्तरातील महिलांनी सहभाग नोंदवला. महिलांचा हा उत्साह  म्हणजे कोल्हापुरी भाषेत नाद खुळा रॅली म्हणावी लागेल.​