रामदेव बाबा आयुर्वेद संस्कृतीचे ब्रँड अॅम्बेसेडर!

योगगुरु रामदेव बाबा देशातील अति-प्राचीन आयुर्वेद संस्कृतीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.

Updated: Sep 5, 2016, 08:46 PM IST
रामदेव बाबा आयुर्वेद संस्कृतीचे ब्रँड अॅम्बेसेडर! title=

नागपूर : योगगुरु रामदेव बाबा देशातील अति-प्राचीन आयुर्वेद संस्कृतीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांच्या माध्यमाने देशाच्या बाहेर जाणारी ७०,००० कोटी रुपयांची रॉयल्टी देशातच राहणार असल्याचे केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.  

इतकेच नव्हे तर बाहेरच्या देशातील चलन देखील आपल्या देशात येण्यास मदत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. येत्या १० तारखेला नागपूरच्या मिहान प्रकल्पात रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहातर्फे फूड पार्कचे भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गडकरी बोलत होते.